उत्पादन माहितीवर जा
1 च्या 15

Peak Laboratories

NPK C5X: उस पिकासाठी एन.पी.के कान्सोर्तिया फुटव्यासाठी बेस्ट प्रोडक्ट १ किलो टाल्क पावडर बेस

NPK C5X: उस पिकासाठी एन.पी.के कान्सोर्तिया फुटव्यासाठी बेस्ट प्रोडक्ट १ किलो टाल्क पावडर बेस

नियमित किंमत Rs. 299.00
नियमित किंमत Rs. 1,450.00 विक्री किंमत Rs. 299.00
विक्री विकले गेले
शिपिंग चेकआउट करताना गणना केली जाते.
Formulation
प्रमाण

 

सामग्री: ॲझोटोबॅक्टर, ऍसिटोबॅक्टर, रायझोबियम, पी.एस.बी, के. एम. बी जीवाणू संच 2X108 cell/gm

फायदे:

१. नायट्रोजनचा पुरवठा वाढतो

ऍझोटोबॅक्टर आणि ॲसिटोबॅक्टर हे वातावरणातील नायट्रोजन स्थिर करतात, तर रायझोबियम ऊसाच्या मुळांजवळ सहकार्यात्मक नायट्रोजन फिक्सेशनला चालना देतात. यामुळे युरिया वापर कमी होतो आणि ऊसाच्या वेगवान वाढीसाठी नायट्रोजन मिळते.

२. फॉस्फरसची उपलब्धता सुधारते

PSB जीवाणू पिकाला मातीमधून उपलब्ध होत नसलेल्या फॉस्फरसला पाण्यात विरघळणाऱ्या स्वरूपात बदलतात, यामुळे मुळांची वाढ, ऊर्जा हस्तांतरण, आणि मुळाची, फुटव्याची तसेच पेराची लांबी वाढते.

३. पोटॅशियमची उपलब्धता सुधारते

KMB जीवाणू खनिजांमधील / खतामधील बंदिस्त पोटॅशियम मुक्त करते, यामुळे ऊसाच्या रोगप्रतिकारक शक्तीत, पाण्याच्या नियमनात, आणि साखरेच्या संचयनात वाढ होते. तसेच उसाची कांडी जाड होते आणि चमकदार होते.

४. साखरेच्या उत्पादनात वाढ

NPK च्या संतुलित पुरवठ्यामुळे सुक्रोज संश्लेषण आणि रसाची गुणवत्ता सुधारते, यामुळे कापणीच्या वेळी साखर पुनर्प्राप्तीचे प्रमाण वाढते.

५. मजबूत मुळांची वाढ

ऍझोटोबॅक्टर आणि PSB ऑक्सिनसारखी (Auxin) वनस्पती हार्मोन्स तयार करतात, ज्यामुळे मुळांची वाढ होते आणि कोरड्या प्रदेशातही पाणी आणि पोषक तत्वांचे शोषण सुधारते.

६. खत खर्चात घट

रासायनिक खतांचा वापर २५-३०% पर्यंत कमी करून खर्चात बचत, पण उत्पन्न कायम राखता येते.

७. रोगप्रतिकारक क्षमता

PSB मधील स्युडोमोनास सारखे जीवाणू प्रतिजैविक पदार्थ तयार करतात, ज्यामुळे रोपकुज, मुळकुज, फ्युजेरियम सारख्या रोगांवर नियंत्रण मिळते.

८. तणाव सहनक्षमता

ऍझोटोबॅक्टर आणि ॲसिटोबॅक्टर कोरडा आणि खारट जमिनीत ऊसाची वाढ सुधारतात, वनस्पतींच्या ऑस्मोटिक समायोजनास मदत करतात.

९. मातीची सुपिकता वाढवणे

सूक्ष्मजीव मातीत सेंद्रिय आम्ल, विकरे आणि जैविक द्रव्ये वाढवतात, ज्यामुळे मोनोकल्चरमुळे झालेली मातीची झीज भरून निघते.

१०. पर्यावरणास अनुकूल शेती

रासायनिक खतांच्या ओहोटीमुळे होणारे भूजल प्रदूषण आणि नायट्रस ऑक्साईड सारख्या वायूंचे उत्सर्जन कमी होते, त्यामुळे शाश्वत ऊस शेतीला चालना मिळते.

ड्रीप : प्रत्येकी १ किलो प्रती एकर

पाटपाणी: प्रत्येकी २ किलो प्रती एकर

 

 


संपूर्ण तपशील पहा