
ऊस पिकामध्ये जीवाणू खते वापरल्याने फायदे
Share
ऊस हे एक महत्त्वाचे व्यापारी पीक आहे, आणि त्याच्या उत्पादनासाठी नत्र (नायट्रोजन), स्फुरद (फॉस्फरस), आणि पालाश (पोटॅशियम) या पोषक तत्वांची आवश्यकता असते. या पोषकांपैकी प्रत्येकाची कार्ये वेगळी असून, जीवाणूंच्या मदतीने त्यांची उपलब्धता सुधारणे शेतीसाठी फायदेशीर ठरू शकते.
१. नत्र जीवाणू (नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया):
नत्र हे ऊसाच्या वाढीसाठी आवश्यक असते. नत्र जीवाणू (उदा., *रायझोबियम*, *अझोटोबॅक्टर*) हे वातावरणातील नायट्रोजन वनस्पतींसाठी ग्राह्य अशा अमोनियममध्ये रूपांतरित करतात. याचा प्रमुख फायदा म्हणजे उसाची उंची वाढणे.
२. स्फुरद जीवाणू (फॉस्फेट सॉल्युबिलायझिंग बॅक्टेरिया):
स्फुरद मुळ्यांच्या वाढीसाठी आणि ऊर्जा हस्तांतरणासाठी महत्त्वाचा आहे. स्फुरद जीवाणू (उदा., पी.एस.बी/ बॅसिलस/प्स्युडोमोनास/) मातीतील अद्राव्य फॉस्फरसला वनस्पतींसाठी उपयुक्त अशा स्वरूपात सोडतात. याचा प्रमुख फायदा म्हणजे मुळ्यांची घनता आणि आरोग्य वाढते. फुलोरा आणि रसाच्या गुणवत्तेत सुधारणा. फॉस्फरसची कार्यक्षमता वाढवून पीक उत्पादन वाढते. तसेच फुटवे जास्त येणे आणि पेरा लांब पडणे हा हि आहे.
३. पालाश जीवाणू (पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया):
पालाश हे रोगप्रतिकारक शक्ती, ऊसाचे वजन आणि उसाच्या गुणवत्तेसाठी महत्त्वाचे आहे. पालाश जीवाणू मातीतील पोटॅशियम वनस्पतींसाठी सहज उपलब्ध करून देतात.याचा फायदा म्हणजे ऊसाच्या देठांना मजबुती मिळते. पिकाचा रोगांशी सामना करण्याची क्षमता वाढते. दुष्काळ सहनशक्ती सुधारते. त्याशिवाय उसाची कांडी जाड होणे हा हि फायदा यामुळे मिळतो.